फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपाअकादमी ऑफ पेडियाट्रिकच्या अध्यक्षपदी डॉ. किरतकर, सचिवपदी डॉ. खतवार: रविवारी पदग्रहण

अकादमी ऑफ पेडियाट्रिकच्या अध्यक्षपदी डॉ. किरतकर, सचिवपदी डॉ. खतवार: रविवारी पदग्रहण

Advertisements

‘पुनरुज्जीवन उत्कटता, समाज आणि बंधुत्व लाभदायक’ हा असणार आहे नवनिर्वाचित पदाधिका-यांचा वार्षिक विषय

नागपूर,१ एप्रिल २०२२: अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सची नवी चमू घोषित झाली असून अध्यक्षपदी डॉ. राजकुमार किरवतकर तर डॉ. प्रितेश खतवार यांची मानद सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये पदग्रहण समारंभ होईल.

समारंभात डॉ. डी. एस. राऊत, संरक्षक डॉ. उदय बोधनकर, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे (वर्मा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच कार्यक्रमाला प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ व आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. कन्ना मडावी अतिथी म्हणून उपस्थित राहतील. डॉ. सोनिया अरोरा आणि डॉ. अर्चना जैस्वाल प्रामुख्याने उपस्थित राहतील. यंदाची थीम ‘पुनरुज्जीवन उत्कटता, समाज आणि बंधुत्व लाभदायक’ ही असून याबाबतची सविस्तर माहिती डॉ.राजकुमार किरवतकर यांनी आज हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.

याप्रसंगी बोलताना डॉ.किरवतकर म्हणाले की या अकादमीचे देशभरात जवळपास ३५ हजार सदस्य आहेत.३५१ शाखा आहेत त्यात नागपूरची शाखा ही खूप प्रभावी आहे.नुकतेच पार पडलेल्या पेडीकॉन कार्यशाळेत नागपूरच्या शाखेने एकूण १४ पारितोषिक पटकावली.या अकादमीची स्थापना १९८१-८२ मध्ये डॉ.नानासाहेब साल्पेकर यांनी केली होती.ते या शहरातील पहीले बालरोगतज्ज्ञ होते.त्यांच्या नेतृत्वातील या शाखेत आतापर्यंत ४० अध्यक्ष होऊन गेलेत.प्रत्येकाने या अकादमीत आपापल्यापरिने भरीव असे लोकाेपयोगी व मार्गदर्शक उपक्रम राबवले. या अकादमीचा उद्देश्‍य म्हणजे जे बालरोगतज्ज्ञ नव्याने सराव करतात आहेत त्यांना मार्गदर्शन करने,माहिती देने,बैठकांमधून प्रबोधन करने,नव्या घडामोडींबाबत अवगत करने,बालकांचे आरोग्य,पौगंडावस्था यासोबतचे विविध सामाजिक उपक्रमांशी जोडने हे या अकादमीची काही मुख्य उद्देश्‍य असल्याचे त्यांनी सांगितले.

एवढा मोठा व्याप सांभाळणे हे कोणालाही एकट्याने करने शक्य नाही त्यामुळेच अश्‍या अकादमी म्हणजे संस्थेची गरज असते.ही एक सर्वस्वी गैर सरकारी संस्था आहे त्यातही प्रत्येक बालरोगतज्ज्ञाला आपापला व्याप असतोच.हा संपूर्ण व्याप सांभाळत अकादमीच्या माध्यमातून आपले सामाजिक दायित्व निभावणे हे अतिशय म्हत्वाचे कार्य असल्याचे डॉ.किरतकर यांनी सांगितले.उदा.गडचिरोलीसारख्या दूर्गम भागात किवा ग्रामीण भागात बालमृत्यू दर हा अधिक आहे.अगदी प्राथमिक माहितीच्या अभावी देखील अनेक नवजात शिशूंचा मृत्यू होतो.दुर्गम तसेच ग्रामीण भागात संसाधनाची किवा मानवी सेवेची कमतरता नसते मात्र कौशल्य व माहितीचा अभाव असतो.‘न्यू बॉर्न ॲण्ड मदर चाईल्ड’ही सामाजिक संस्था दुगर्म भागात चांगले काम करीत आहे,अश्‍या अनेक संस्था आहेत ज्यांचे कार्य नवजात शिशूंच्या व बालकांच्या आरोग्याच्या संदर्भात खूप चांगले आहे.एनबीएम या संस्थेनी नवजात बाळाला गुंडाळण्यासाठी अतिशय उत्तम दर्जाच्या कापड विनले आहे जे बाळाला वेगळीच उब प्रदान करतात अशी माहिती त्यांनी सांगितली.

‘न्यूमेटील फाेरम ऑफ नागपूर‘(एनएनएफ)डॉ.मंडलेकर यांनी या संस्थेमार्फत ब-याच कार्यशाळांचे आयोजन केले.आपल्याकडे मनुष्य बळ आहे पण ट्रेड नाही.खूप सोप्या अश्‍या उपाययोजना असतात बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी,लहान-लहान गोष्टींचं ज्ञान होने गरजेचे असतं.जन्माला आल्यानंतर बाळ सुस्त आहे,बाळ रडत नाही मूत्र विसर्जन करत नाही,तीन तास झाले तरी दूध घेत नाही,अश्‍यावेळी दुर्गम किवा ग्रामीण भागातील परिचारिकेने नेमके काय करावे?याचे ज्ञान आमची अकादमी विविध कार्यशाळा आयोजित करुन व प्रशिक्षण देऊन देत असते.

आत देशात केरळमध्ये सर्वात कमी बालमृत्यू दर आहे कारण तेथील अंगणवाडी सेविका तसेच परिचारिकांना या सर्व मूलभूत बाबींचं ज्ञान देण्यात आलं आहे.केरलमध्ये बालमृत्यूचा दर ५ टक्के आहे तर इतर राज्यात तोच दर हा २८ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली.बालमृत्यूचा दर खाली अानण्यासाठीच अनेक उच्च विद्या भूषित डॉक्टरांच्या हाताची अकादमीला गरज आहे.कौशल्य,पैसा,जागरुकता सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी महत्वाची असतात.पालकांची मानसिकता हा देखील एक जटील प्रश्‍न आहे.आधीच कोविड-१९ मुळे पालक वर्ग हा आर्थिकदृष्टया अडचणीत आला आहे त्यात त्याची मानसिकता आपल्या पाल्यांवर खासगीतच उपचार करण्याची असते.सरकारी रुग्णालयात तो पाल्यांवर उपचार करण्यासाठी सहसा बधत नाही.शून्य ते १९ दिवसांच्या बाळाचा तर आपल्या देशात विमाच काढला जात नाही.त्यामुळेच कोणत्याही लग्न समारंभात पाहूण्यांनी नवदाम्प्त्यांना किमान ५ हजाराची तरी विमा पॉलिसी द्यावी जेणेकरुन येणा-या नवजात शिशूला त्याचा वेळेवर फायदा होईल.अनेक पालक हे सुशिक्षीत असतात,समजूतदार असतात मात्र त्यांना देखील आपल्या पाल्यांसाठी नेमके काय करावे?याचं ज्ञान नसतं.डॉ.बेलाेंडे यांच्या मार्गदर्शनात ‘रॅशनल रुलर पिडीयाट्रीक प्रॅक्टीस‘(आरआरपीपी)या संस्थेने तर काय नाही करायला हवं?हा उपक्रम सुरु केला.माझ्या कारकीर्दीत मी हा अतिशय चांगला उपक्रम पुढे नेणार असल्याचा निर्धार यावेळी डॉ.किरतकर यांनी व्यक्त केला.

आपल्या देशात २००१-२००२ च्या काळात बॅक्टीरियल इंफेक्शनमुळे अनेक बालके दगावत होती,उत्तर प्रदेशात हा प्रकोप अजून ही आढळतो.अचानक बालकांना खूप ताप येतो आणि बालके दगावतात.अलीकडच्या काळात मात्र व्हायरल इंफेक्शनचे प्रमाण वाढले आहेत त्यामुळेच बालकांना दिल्या जाणा-या संरक्षण लसींचे प्रमाण वाढले आहे.पूर्वी लहान बालके ही अक्षर:शहा मातीत खेळत होती.यामुळे त्यांना संक्रमण होत असे,ते आजारी देखील पडते होते मात्र यामुळे त्यांच्यात रोग प्रतिकार शक्ती देखील वाढत होती.अलीकडच्या काळात ॲलर्जीचा प्रकार देखील खूप बालकांमध्ये आढळतो.याबाबतच्या जनजागृतीसाठी आमची अकादमी दर वर्षी जूनमध्ये कार्यशाळा राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय स्तपानाचे महत्व याबाबतच्या जनजागृतीसाठी नोव्हेंबरमध्ये कार्यशाळेचे आयोजन होणार असल्याचे ते म्हणाले.

सचिव डॉ.प्रितीश खतवार यांनी आमची एक राष्ट्रीय कार्यकारिणी असल्याचे सांगितले.डॉ.कीरतकर यांनी सांगितलेल्या उपक्रमांशिवास आम्ही लठ्ठपणा यावर देखील कार्यशाळा आयोजित करीत असतो.नुकतेच ५ मार्च रोजी आम्ही आयएमए ते अंबाझरी व परत आयएमए या मार्गावर सायकल रॅलीचे आयोजन केले होते ज्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.याशिवाय वेळोवेळी उस्फूर्त असे अनेक उपक्रम राबवले जातात.उदा.डॉक्टर्स डे,डाऊन सिंड्रोम डे,ऑटिझम अवेअरनेस डे,थैलीसिमिया,ओआरएस,ब्रेस्ट फिडींग,ॲण्टी ब्रेस्ट फिडिंग,नॅशनल ॲण्टी बॉडी डे,वर्ल्ड एनिमिया डे आदी.हे सर्व उपक्रम आयटीआर च्या अंतर्गतच साजरे केले जातात.

यावेळी सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उदय बोधनकर यांनी या वेळी या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा विषय ’जूनून का कायाकल्प,लाभकारी और बंधूत्व’ हा असल्याचे सांगितले.या अकादमीमार्फत अनेक समाजसेवेचे उपक्रम सातत्याने पार पाडले जात असल्याचे सांगून ही अकदामी म्हणजे समाजाप्रतिची आपली सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असल्याचे ते म्हणाले.गडचिरोलीसारख्या भागात या संस्थेतर्फे लवकरच तेथील समाजसेवाव्रती डॉ.अमाेल कोल्हे व इतरांना ११०० रुपयांच्या औषधांच्या किट वाटप केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ.संजय देशमुख यांनी आयआयपी बॉडी नेमके कोणकोणते कार्य करते याची सविस्तर माहिती दिली.नागपूरात क्षयरोग कसा आटोक्यात आणायचा या विषयावर भव्य अशी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.नॅशनल ट्यूबोक्लोसिस इरेडिक्शन प्रोग्राम(एनटीइपी) ही राष्ट्रीय स्तरावरची कार्यशाळा येत्या जूनमध्ये पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यात किमान जगभरातील शंभर डॉक्टर्स आपला सहभाग नोंदवणार असून क्षयरोगावर सखोल असे विश्‍लेषण होणार आहे.‘अर्ली चाईल्डहूड डेव्हलपमेंट’(इसीडी)अंतर्गत ८० टक्के बालरोगतज्ज्ञांना येत्या सप्टेंबर मध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.पूर्ण भारतात अश्‍या ४०० कार्यशाळा जिल्हास्तरावर राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकार व यूनिसेफसोबत या उपक्रमासाठी टायअप झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.याशिवाय सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी ४० हजार रुपये एखाद्या सामाजिक संस्थेला देत असतो.या संस्थेची निवड आमच्या अकादमीतील श्रेष्ठी करीत असतात,अशी माहिती त्यांनी दिली.

डॉ.वसंत खळतरकर यांनी कोव्हॅक्सीन परिक्षणासाठी नागपूरातील प्रसार-प्रचार माध्यमांचे महत्वाचे सहाय्य मिळाले यासाठी आभार मानले.नागपूरात १४० मूलांना ही लस देण्यात आली होती.माध्यमांनी केलेल्या जनजागृतीमुळेच नागपूरातील पालक स्वत: त्यांच्या पाल्यांना लसीच्या परिक्षणासाठी माझ्याकडे घेऊन आले असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.२ ते १८ वर्षांपर्यंत मुलांसाठी त्यामुळेच लसीला या परिक्षणानंतर परवानगी मिळू शकली.केंद्रातील महिला व बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी आमच्या ‘पॅरेन्टल गाईडलाईन’या माहितीपर पुस्तकाचे विशेष कौतूक केले व या पुस्तकात बालकांच्या आरोग्याप्रतिची सर्व मार्गदर्शक तत्वे अंर्तभूत असल्याने या माहितीला त्यांच्या मंत्रालयातर्फे राबविल्या जाणा-या योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.हे पुस्तक अद्याप इंग्रजी भाषेत जरी उपलब्ध असले तरी लवकरच ते इतर ही भाषांमध्ये भाषांतरीत होणार असल्याची माहिती डॉ.खळतकर यांनी दिली.आपल्या बालकांच्या आरोग्यायप्रति प्रत्येक पालकांनी जागरुक राहण्यासाठी हे माहितीपर पुस्तक जवळ बाळगणे व वाचत राहणे नितांत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हॉटेल सेंटर पॉईंट येथे रविवार दि.३ एप्रिल रोजी होणा-या पदग्रहण सोहळ्याला संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. विजय धोटे आणि डॉ. पंकज अग्रवाल यांनी केले.

अशी आहे नवनियुक्त कार्यकारिणी-
अध्यक्ष- डॉ. राजकुमार किरतकर, मानद सचिव डॉ. प्रितेश खतवार, माज अध्यक्ष- डॉ. विजय धोटे, माजी सचिव डॉ. पंकज अग्रवाल,अध्यक्ष निवड: २०२२ डॉ. संजय पाखमोडे, उपाध्यक्ष डॉ. अर्चना जैस्वाल, डॉ. कुश झुनझुनवाला, कोषाध्यक्ष डॉ. महेश तुराळे, सहसचिव डॉ. दिनेश सरोज, डॉ. सोनिया अरोरा. सल्लागार मंडळाचे सदस्य: डॉ. बी.पी. खोब्रागडे, डॉ. डी.एस. राऊत, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. निशकांत कोतवाल, डॉ. आर. जी. पाटील, डॉ. व्ही. एस. दाणी, डॉ. वसंत खळतकर

सहकारी सदस्य- डॉ. अनिल राऊत, डॉ. अनुप रडके, डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ. सुचित बागडे, विशेष निमंत्रित: डॉ. अमित नेमाडे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. कुलदीप सुखदेवे, डॉ. मोहिब हक, डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. रवींद्र भेोंडे, डॉ. शिरीष मोदी.

कार्यकारिणी: डॉ. अभिषेक सोंडवाले, डॉ. अमित डहाट, डॉ. अंजू कडू, डॉ. गजानंद पौनीकर, डॉ. गिरीश चराडे, डॉ. हिमालली मेश्राम, डॉ. कीर्तिश बालपांडे, डॉ. मीना देशमुख, डॉ. मुस्तफा अली, डॉ. निखिल लोहिया, डॉ. पल्लवी बापट, डॉ. पवन रामटेके, डॉ. ऋषी लोडाया, डॉ. रिजवान अहमद, डॉ. रुपाी खोब्रागडे, डॉ. समीत उमाटे, डॉ. शिल्पा भोयर आणि डॉ. योगेश पापडे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या